प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दि. १०, ११ व १२ जुलै असे तीन दिवस बंगलोर येथे संपन्न होणार असून देशातून निवडक ३००० युवक कॉंग्रेस पदाधिकारी यात सहभागी होतील असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी ईशान खान यांनी सांगितले. भारतीय युवक काँग्रेसच्या महत्वाकांक्षी "बेहतर भारत की बुनियाद" या उपक्रमा संदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस तर्फे आज पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसची आढावा बैठक पार पडली त्यात ते बोलत होते.
खान पुढे म्हणाले की, युवक काँग्रेसतर्फे करण्यात आलेले ॲप लॉंचमधून युवकांना जोडण्याचे काम होणार आहे. काँग्रेस पक्षाचा त्याग, योगदान, धोरण, कार्य तसेच भारताची विविधता व परंपरा यामध्ये सर्वांना सामावून घेण्याचे पक्षाने केलेले कार्य ॲपच्या माध्यमातून घरोघरी पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संमेलनात युवकांसाठीच विविध योजनांचे विचार मंथन होऊन त्यांच्या बेरोजगारी, महागाई, त्यांच्या होणाऱ्या विविध समस्या सोडवण्याचे प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केले जाणार आहेत असे त्यांनी शेवटी सांगितले.
या बैठकीला प्रदेश सहप्रभारी ईशान खान , प्रदेश महासचिव सचिव, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस प्रभारी प्रथमेश अबनावे, प्रदेश महासचिव अनिकेत नवले, प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष स्वप्नील बनसोडे, सोनाली खंदारे, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, विनिता तिवारी, रोहित भाट, वसीम शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, मिलिंद बनसोडे, पूजा चिंडालिया, सोशल मीडिया समन्वयक जय ठोंबरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.