प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुणे हे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते, त्याच शिक्षणाच्या माहेर घरात चक्क शिक्षकांना आपल्या हक्कासाठी अथक संघर्ष करावा लागला , चार दिवस उपोषण करावे लागले .शिक्षकांनी सुद्धा जो पर्यन्त न्याय मिळत नाही तो पर्यन्त आंदोलन बंदच करायचे नाही अशी भिस्म प्रतिज्ञाच केली होती , आपल्या जीवाची पर्वा न करता आंदोलन केले. या आंदोलनामुळे पुणे शहरात जोरदार खळबळ उडाली होती
विविध पक्षातील राजकीय नेते उपोषण स्थळी भेट घेऊन आपला प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले . मानधनवाढ मिळावी आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कायम सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये रजा मुदतीवरील शिक्षकांचे मानधन सहा हजारांवरून 16 हजार रुपये करण्यात येईल, तसेच कायम सेवेत घेण्याबाबत नगरविकास विभागाकडून अहवाल मिळताच निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानंतर शिक्षकांचे चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. याचे सर्व श्रेय शिक्षकांची एकजूट व खंभिर पणे केलेले आंदोलना मुळे त्यांना शेवटी न्याय मिळाला आहे.