प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे येथील मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ परिसरात आज सकाळी एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने वार केले.शंतनू जाधव असे आरोपीचे नाव आहे.सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस ठाण्याजवळ आरोपी शंतनूने तरुणीवाल यांच्यावर कोयत्याने वार केले.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. शंतनूचं या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं तिने नकार दिल्यानंतरही तो तिच्या मागे लागला. यासोबतच तो सतत जीवे मारण्याच्या धमक्याही देत असल्याची माहिती समोर आली आहे.हा सर्व प्रकार टिळक रोड ते पेरू गेट पोलीस ठाणे हद्दीतील असून या ठिकाणी एका तरुणाने कोयत्याने तरुणीवर हल्ला केला. त्याचवेळी पुणेकर दोन धाडसी तरुण जीवाची पर्वा न करता मुलीला वाचवण्यासाठी पुढे आले. हातात कोयता असतानाही या दोन्ही तरुणांनी हल्लेखोराला पकडले.यशपाल जवळगे असे या शूर तरूणाचे नाव आहे. यशपालाने हा भीषण हल्ला कसा झाला याची माहिती दिली. यशपाल हा तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात राहतो.पुणे पोलिसांनी आरोपी शंतनूला अटक केली आहे.