नको जात पंथ नको भेदभाव तोचि खरा माणुस ज्याचे माणुसकीचे भाव,
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सालाबाद प्रमाणे डॉ. पी. ए ईनामदार , एमसीईच्या व्हाईस चेअरमन आबेदा इनामदार यांच्या नेतृत्वा खाली सुफी वारकरी विचार मंच' व मुस्लीम बँक पुणे यांच्या विद्यमाने वारकरी बंधु भगिनी साठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप करण्यात आले मुस्लीय को ऑप बँक लि. रविवार पेठ शाखा येथे शिबीर संपन्न झाली
या वेळी 700 ते 800 वारकरी बंधु भगिनीची तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले तसेच डॉ शारीक खान त्यांच्यासह डॉकटर सहकाऱ्यांनी झेंड व्ही. एम मेडिकल कॉलेडा च्या माध्यमातून हा उपक्रम राबविला या मध्ये सुफी वारकरी विचार मंच चे मश्कुर अहम शेख उमरशरीफ शेख, आदिल खान हिदायत मोगल शब्बीर नामा मोकाशी शकील शेख कोथरुड या आरोगा शिबीराचे आयोजन केले . अंजुम हाजी शेख , अरब सहाब , अदिलं खान , हिदायत मोगल , शब्बीर मोकाशी , आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची माहिती प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य प्रतिनिधी व मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांनी दिली.