दोन हजार विद्यार्थी - विद्यार्थिनी योग प्रात्यक्षिके सादर करणार*
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे बुधवार, दिनांक २१ जून रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. संस्थेच्या विद्यालयांमधील दोन हजारहून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनी तसेच शिक्षक सहभागी होणार आहेत.हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे होणार आहे. त्याचा सराव सुरु असल्याचे 'आझम स्पोर्ट्स अकादमी'चे संचालक गुलझार शेख यांनी सांगितले.
Tags
पुणे