आगीत 20 गोदामे जळून खाक, या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहरातील कोंढवा परिसरातल्या गंगाधाम चौकाजवळ असलेल्या आई माता मंदिराजवळील गोदामांमध्ये भीषण आग लागली आहे. आग लागलेल्या २० गोदामांमध्ये बिस्कीट, सिमेंट, मोल्डिंग आणि अन्य साहित्य भरलेली आहे. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही आग लागली असून यात कोट्यवधींचं साहित्य जळून खाक झालं आहे.
आग कशामुळं लागली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या २२ गाड्या आणि जवानांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न जारी आहे. याशिवाय पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.पुण्यात लागलेल्या या आगीनंतर आता बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. आग नियंत्रणात आणल्यानंतर परिसराचं कूलिंग केलं जाणार आहे.