काँग्रेसच्या मागणीला यश ; चुकीच्या निर्णयाला स्थगिती नको, कायमस्वरूपी अधिकारी नेमा --- मोहन जोशी


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे आकाशवाणी केंद्राचे वृत्त विभाग केंद्र बंद करण्याच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परंतु पुणेकर जनतेचा असलेला रोश व काँग्रेसने केलेली मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनी केलेली ही तात्पुरती मलमपट्टी आहे. पुणेकरांना स्थगिती नको निर्णय कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे अशी काँग्रेसची मागणी आहे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी म्हंटले आहे.  

मोहन जोशी पुढे म्हणाले की, यासाठी केवळ सक्षम माहिती अधिकारी नाही असे कारण सांगून हे केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता मात्र हे कारण पुन्हा मिळू नये त्यासाठी केंद्र सरकारने भारतीय माहिती सेवेतील सक्षम अधिकाऱ्याची येथे नेमणूक करावी म्हणजे पुणे आकाशवाणी केंद्राचे वृत्तसेवा केंद्र बंद होण्याचा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही तसेच पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने मार्गी लागण्यासाठी हाती घेतल्यावर पुणेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठींब्या बद्दल पुणेकरांचेही आभार मानतो असे मोहन जोशी शेवटी म्हणाले. 


मोहन जोशी 

उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी 

९८२२०९६७२०

Post a Comment

Previous Post Next Post