माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे व माजी प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना....
प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ. तुषार निकाळजे
पुणे:- नुकतीच वर्ल्ड रँकिंगची शैक्षणिक विद्यापीठे व संस्था यांची यादी जाहीर झाली. यामध्ये तब्बल २०० क्रमांकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रमवारीत पुढे आले. मागील पाच वर्षांचा इतिहास पाहता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रमवारीत घसरण झाली होती.
गेल्या दीड वर्षांपूर्वी डॉ. नितीन करमळकर व प्र- कुलगुरु डॉ.उमराणीकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आला होता. नंतर प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. कारभारी काळे व प्रभारी प्र- कुलगुरू म्हणून डॉ. संजीव सोनवणे यांची नेमणूक झाली होती. गेल्या दीड वर्षात या दोघांनी केलेल्या आटोकाट प्रयत्नानंतर व अथक परिश्रमानंतर आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीतील क्रमांक तब्बल २०० क्रमांकाने उंचावला आहे. याचे सर्व श्रेय माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे व माजी प्रभारी प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनाच देणे अपेक्षित आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत या दोघांनी विद्यापीठाची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करण्याचा प्रयत्न केला आहे.