आझम कॅम्पस मध्ये अत्तर, गुलाब, चॉकलेट वाटप
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यानी बुधवारी २८ जुन रोजी आझम कॅम्पस येथे बकरी ईद ( ईद-अल-अधहा ) साजरी केली.भारतातील ईदच्या एक दिवस आधी परदेशातील चंद्र दर्शनाच्या वेळापत्रकाप्रमाणे ही ईद २८ जुन रोजी साजरी करण्यात आली.
बुधवारी सकाळी साडेसात वाजता अरब, आखात ,येमेन ,सुदान ,इराण ,सौदी अरेबिया,अफगाणिस्तान आणि अनेक देशातील सुमारे १ हजार विद्यार्थी आझम कॅम्पस मशिदीमध्ये नमाज पठणासाठी एकत्र आले. विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र नमाज पठणाची व्यवस्था करण्यात आली होती.नमाज पठण केल्यानंतर सर्वानी प्रेमाने एकमेकांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प ,अत्तर, चॉकलेट देण्यात आले.या विद्यार्थ्यांनी एकमेकांसमवेत फोटो काढण्याचा, सेल्फीचा आनंद लुटला आणि घरच्यांना लगोलग सोशल मीडियाद्वारे ख्याली खुशाली कळवली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच 'डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी' चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.या व्यवस्थेबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल विद्यार्थ्यांनी डॉ.पी.ए.इनामदार यांचे आभार मानले.