प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : डॉ.पी. ए. इनामदार यांच्या ‘इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’(वानवडी)च्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १३ जून २०२३ रोजी हे शिबिर ७८- गुरुवार पेठ, नवयुग मित्र मंडळ, शीतळादेवी चौकाजवळ सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरु होते, हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेझ इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात हॉस्पिटलचे डॉ.श्रीकांत कदम,इतर तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारीका, सहाय्यक वर्ग यांनी वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार केले ,तसेच मोफत औषधे दिली.हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी शिमॉन राऊत यांनी स्वागत केले. या उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते.