प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिका येथील रजा मुद्दतीतील प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून कार्यरत (93) प्राथमिक शिक्षकांचे प्रथम नेमणूक दिनांकापासून सेवा वेतन श्रेणी सह नियमित करण्याची महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी .
पुणे माननीय उच्च न्यायालय मुंबई याने रिट याचिका क्रमांक 11703/2019 मधील दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुणे महानगरपालिका येथील रजा मुद्दतीतील प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून अकरा वर्षापासून कार्यरत शिक्षण सेवकांचे प्रथम नेमणूक दिनांक पासून सेवा वेतन श्रेणी सह नियमित करून आपल्या कार्यालया समोर प्रश्न सुटेपर्यंत बेमुद्दत आमरण उपोषणास बसलेले (93) शिक्षकांना न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम ए गफ्फार तसेच पुणे विभागीय अध्यक्ष खान नसीर अहमद बशीर अहमद यांनी मा.आयुक्त पुणे महानगरपालिका पुणे यांच्या कडे केली आहे.