बकरी ईद कोणत्याही अडथळयांशिवाय आनंदाने साजरी होणार

बकरी ईद कोणत्याही अडथळयांशिवाय आनंदाने साजरी होणार 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे- पुढील आठवडयात जगभरात साजरी होणारी बकरी ईद पुणे शहरातील प्रथा व परपरेंनुसार सर्व समाज बांधवांना सोबत घेवून कोणत्याही अडथळयांशिवाय आनंदाने साजरी केली जाणार आहे. असा निर्धार आज पुणे शहरातील सर्व मुस्लिम बांधव व पोलीस यांनी संयुक्त बैठकीद्वारे केला आहे.

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे वतीने पुणे पोलीस व मुस्लिम समाज बांधवाची संयुक्त बैठक अल्पबचत भवन येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांचे सह नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे रशिद शेख , राहुल डंबाळे, माजी आमदार मोहन जोशी, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे माजी नगरसेवक रफिक शेख, डॉ. सिध्दार्थ

धेंडे, रईस सुंडके, हनिफ शेख, मंजुर शेख, हाजी फिरोज, आयुब शेख, हसिना इनामदार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे मौलना निझामुद्दीन, जमियत उलमाये हिंद चे कारी इद्रीस, मुक्ती शाहीद, शिया समाजाचे मौलना शबी हसन काझमी, वंचित आघाडीचे मुनवर कुरेशी, मेहबुब नदाफ, जाहिद शेख, संगिताताई तिवारी, समीर शेख, युसुफ शेख, आरिफ चौधरी, सुफियान चौधरी, अजहर चौधरी, रफिक अन्सारी, इकबाल शेख, नदीम मुजावर, हसन कुरेशी, आसिफ शेख, साबीर शेख, सत्यवान गायकवाड, आबीद सय्यद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर बैटकीमध्ये बकरी ईदच्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या विषयी अनेक महत्वपुर्ण व विविध प्रकारच्या मागण्या उपस्थितांनी पोलीस अधिकारी यांचेकडे केली. यावेळी सर्व सुचनांचा गार्भियपुर्वक विचार करून पुणे शहराचा सर्व समावेशकतेचा व सर्व धर्मसमभावाचा संस्कार लक्षात घेवून पुणे शहरातील सर्व नागरीक व मुस्लिम बांधव एकमेकांना सर्व सहकार्य करून बकरी ईदचा सण आनंदाने साजरा करतील अशी भुमिका मा.संदीप कर्णिक, सह पोलीस आयुक्त यांनी उपस्थित समोर मांडली.

बैठकीचे आयोजन माजी नगरसेवक व नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे राष्ट्रीय संयोजक रशिद शेख यांनी केली होते. प्रस्ताविक राहुल डंबाळे यांनी केले. तसेच सुत्रसंचालन जुबेर मेमन यांनी केले तर आभार खिसाल जाफरी यांनी मानले


(राहुल डंबाळे) अध्यक्ष नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी

Post a Comment

Previous Post Next Post