प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे- राज्य सरकार कडून शिक्षण हक्क कायद्याचा (RTE) लाभ घेऊन शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची मुस्कटदाबी करण्याचा घाट घातलेला दिसत आहे. खाजगी हक्क कायद्याच्या अंतर्गत २५% टक्के एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत ऍडमिशन मिळणं अपेक्षित आहे मात्र मागील ४ वर्षांपासून या खाजगी शाळांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले असताना ही शाळा त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही. वेगवेगळे कारणे देऊन ऍडमिशन नाकारले जातात. यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना सरकारच्या या धोरणामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे
राज्यात या विद्यार्थ्यांच्या हक्काचे ₹१८०० कोटी रुपये संबंधित शाळांना राज्य शासनाकडून देण्यात आलेले नाहीत. सदर रुपये त्वरित शाळांना देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करून द्यावा यासाठी आम आदमी पक्षाकडून पुणे जिल्हापरिषद येथे निदर्शने करण्यात आले
मनोज शेट्टी (बीए)
प्रभाग क्रमांक 9 येरवडा
आम आदमी पार्टी, पुणे शहर
8411852210 / 9763298404