'तेर एन्व्हायरॉथॉन-रन फॉर एन्व्हायरॉन्मेंट ' ला उस्फुर्त प्रतिसाद

  पाचशे हून अधिक पर्यावरण दूतांचा सहभाग 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  'तेर पॉलिसी सेंटर ' या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या   पुणे स्थित संस्थेने आयोजित केलेल्या ' एन्व्हायरॉथॉन - रन फॉर एन्व्हायर्नमेंट  ' या उपक्रमाला रविवारी पुणेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील  ५०० हुन अधिक पर्यावरण दूत,नागरिक सहभागी झाले. 

 पुणे ग्रामीण पोलीस हॉकी ग्राउंड(पाषाण) वरून रविवारी, ४ जून ला  पहाटे ५ वाजता  एन्व्हायरॉथॉन सुरु झाली . महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक महादेव कसगावडे ,  थिस ग्रिड्झ(प्रोग्रॅम मॅनेजर,ग्लोबल नेचर फंड, जर्मनी),आयर्न मॅन हेमंत परमार,ज्येष्ठ कबड्डी पटू शांताराम जाधव,एव्हरेस्ट वीर लहू उगाडे, जयंती फडके,विक्रम कार्डोझो ,हेमंत वाटवे,महेश गावस्कर,विक्रांत अरगडे,या मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले .तेर पॉलिसी सेंटर च्या संस्थापक डॉ .विनिता आपटे  यांनी स्वागत केले .श्रीराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. 

यावर्षी पुणे ,दौंड ,मुंबईसह ,कर्नाटक , आसाम , दिल्ली ,हरियाणा ,हैदराबाद येथून अनेक पर्यावरणप्रेमी स्पर्धक सहभागी झाले  . स्पर्धा १२ ते १८ ,१९ ते ४० ,४१ ते ५५ व ५६ पेक्षा जास्त अशा गटा मधून घेण्यात आली  . तीन ,पाच आणि दहा किलोमीटर असे विविध गट होते. १०कि मी साठी रोख पारितोषिक व पाच व ३ कि मी साठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली . 

  'डॉ विनिता आपटे म्हणाल्या, 'ही फक्त  स्पर्धा नसून पर्यावरण जागृती साठी चा जागर आहे. पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.दर वर्षी आम्ही ५० हजार झाडे लावतो.शिवाय एन्व्हायरॉथॉन स्पर्धेत जितके लोक सहभागी होतात, तितकी संख्या या  ५० हजारात  वाढवून ही सर्व झाडे दरवर्षी 'तेर पॉलिसी सेंटर ' कडून डोंगरांवर लावली जातात,हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.यावर्षी पुण्यातील वारजे टेकडीवर वृक्षारोपण केले जाणार आहे.'

स्पर्धेचा निकाल,प्रथम क्रमांकाचे विजेते

वय वर्ष ४१ ते ५५(पुरुष) ३ किलोमीटर गट-महेश थेटे,वय वर्ष १९ ते ४० (पुरुष) ३ किलोमीटर गट -शिवम लवांडे,वय वर्ष १९ ते ४० (महिला) ३ किलोमीटर गट -शिल्पी ओसवाल,वय वर्ष १२ ते १८ ,३ किलोमीटर गट-सारा भट,वय वर्ष १२ ते १८(पुरुष) ३ किलोमीटर गट,-धियान पेरिया,वय वर्ष ४१ ते ४५(महिला) ५ किलोमीटर गट-नमिता चौधरी,वय वर्ष ४१ ते ५५(पुरुष) ५ किलोमीटर गट-पांडुरंग पाटील,वय वर्ष १२ ते १८(पुरुष) १० किलोमीटर गट-वैभव शिंदे ,वय वर्ष १९ ते ४० (महिला) १० किलोमीटर गट -रुही बानो,वय वर्ष १९ ते ४० (पुरुष) १० किलोमीटर गट-नीरज यादव,वय वर्ष ४१ ते ५५(पुरुष) १० किलोमीटर गट -सुनील शिवणे,वय वर्ष ४१ ते ५५ (महिला) १० किलोमीटर गट -गौरी गुमास्ते,वय वर्ष ५६ (पुरुष) १० किलोमीटर गट -उदय महाजन,वय वर्ष १२ ते १८(पुरुष) ५ किलोमीटर गट -यश जगताप,वय वर्ष १९ ते ४० (पुरुष) ५ किलोमीटर गट -अजय सपकाळ ,वय वर्ष १९ ते ४०(महिला) ५ किलोमीटर गट -अनन्या कौशिक,वय वर्ष १२ ते १८(महिला) ५ किलोमीटर गट -स्वरदा कुलकर्णी

जागृती आणि संवर्धनासाठी उपक्रम

तेर पॉलिसी सेंटर ही संस्था जंगल वाढविणे , विहिरींचे पुनरुज्जीवन करणे , पर्यावरण शिक्षण व पर्यावरण जागृती साठी प्रयत्नशील असणारी संस्था . संस्थेने आजपर्यंत पुण्यासह महाराष्ट्र ,गुजराथ ,कर्नाटक ,आसाम ,भुवनेश्वर ,गोवा ,राजस्थान इथे विविध ठिकाणी  तीन लाखापेक्षा जास्त वृक्ष लावून त्यांची जोपासना केली आहे . संस्थेच्या सर्वच उपक्रमांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो ,कॉर्पोरेट कंपन्या मदत करतात त्यामुळे कामाचा उत्साह वाढतो ,असे तेर पॉलिसी सेंटर च्या संस्थापक डॉ .विनिता आपटे यांनी सांगितले. 

फोटो ओळ :

'तेर एन्व्हायरॉथॉन-रन फॉर एन्व्हायरॉन्मेंट ' पारितोषिक वितरण प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक महादेव कसगावडे ,  थिस ग्रिड्झ(प्रोग्रॅम मॅनेजर,ग्लोबल नेचर फंड, जर्मनी),डॉ.विनिता आपटे ,ज्येष्ठ कबड्डी पटू शांताराम जाधव,एव्हरेस्ट वीर लहू उगाडे, जयंती फडके,हेमंत वाटवे,विक्रांत अरगडे



Post a Comment

Previous Post Next Post