पुणे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शहर काँग्रेसच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर.



प्रेस मीडिया लाईव्ह :

     पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून शांतता, सुव्यवस्था व सुरक्षा या शहरामध्ये उत्तमपणे गेली कित्येक वर्षे पाहावयास मिळते. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, संगमनेर आदी शहरांमध्ये काही अनुचीत प्रकार घडलेले आहेत. या प्रकारांचे पर्यावसण सांप्रदायिक वाद - विवाद व दंगलीमध्ये होत असल्याचे चित्र आहे. एखाद्या चूकीच्या प्रकाराबद्दल मोर्चे काढणे व त्यास जातीयवादी रंग देणे व शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडविणे असे प्रकार आपल्याला पहावयास मिळाले आहेत.

     पुण शहरामध्ये असे कोणतेही प्रकार घडू नयेत या दृष्टीने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंध करणारे उपाय तातडीने पोलीसांनी अमंलात आणावेत. जी मंडळी अशा प्रकारचे उद्योग करतात त्यांच्यावर लक्ष ठेवावे या संदर्भात आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त मा. रितेश कुमारजी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस सह आयुक्त मा. संदिप कर्णिक साहेब उपस्थित होते.

     यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्‍यवहारे, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी, अजित दरेकर, मुनाफ शेख, सनी रणदिवे, रघुराज दरेकर आदी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post