पुणे महानगरपालिके कडून र.रु. १ कोटीपर्यत बक्षिस असलेली लॉटरी योजना घोषित करण्यात आली आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, सन २०२३-२४ ची देयके आपणास वितरीत करण्यात आली असून दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत आपला संपूर्ण मिळकतकर भरा व सर्वसाधारण करावर ५ किंवा १०% सवलत मिळवा. दि. १५ मे २०२३ ते दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत आपल्या निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा यांचा संपूर्ण मिळकतकर भरल्यास पुणे महानगरपालिके कडून र.रु. १ कोटीपर्यत बक्षिस असलेली लॉटरी योजना घोषित करण्यात आली आहे. ज्यामध्ये ५ पेट्रोल कार, १५ ई-बाईक, १५ मोबाईल फोन, १०लॅपटॉप अशी एकूण ४५ बक्षिसे मिळकतधारकांना प्राप्त होतील. लॉटरी योजनेचा लाभ घेणेसाठी कुठल्याही प्रकारे अर्ज करण्याची आवश्यकता नाही केवळ आपला संपूर्ण मिळकतकर दि. १५ मे २०२३ ते दि. ३१ जुलै २०२३ ह्या कालावधीत भरणे आवश्यक आहे. 

कर आकारणी व करसंकलन विभागाकडून मे महिन्यापासूनच थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी मिळकतीवर सिलिंग कारवाई मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे, एका महिन्यात ४०० हून अधिक बिगरनिवासी मिळकती विभागाकडून सील करण्यात आल्या आहेत. यापुढेही थकबाकी असलेल्या मिळकतीवर सिलिंग कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.



(अजित देशमुख) उप आयुक्त, कर आकारणी व करसंकलन प्रमुख, पुणे महानगरपालिका

Post a Comment

Previous Post Next Post