प्रेस मीडिया लाईव्ह :
"आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला ,कौतुकाचा हा किनारा पावला आणि धन्य झाला !! . "इन्फिनिटी अकॅडमीच्या "गौरव यशाचा" सत्कार समारंभ पुण्यात नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित केला गेला होता .
सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवरांमध्ये, मा.डॉ.अरुण अडसूळ सर(माजी सदस्य MPSC), प्रवीण कोल्हे (SE, जलसंपदा विभाग),श्वेता कुऱ्हाडे (कार्यकारी अभियंता), राज देशमुख ( सामाजिक कार्यकर्ते) ऋतुराज काळे (इन्फिनिटी अकॅडमी)यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक नगररचनाकार, तसेच इतर अभियांत्रिकी सेवांमधील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांच्या सोबतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवडलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्फिनिटी अकॅडमीचे संचालक गिरीश खेडकर यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रमोद देशकरी व माधव जगताप यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले
Tags
पुणे