प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुणे गुन्हे शाखेने अमली पदार्थांची मोठी कारवाई करत ऊरळी-कांचन परिसरात छापा मारून ३६ लाखांचा साठा पकडला आहे. दिल्ली स्थित तरूणाकडून एमडी, बंटा गोळ्या आणि इतर असा ऐवज जप्ता केला आहे. या कारवाईने शहरात जोरदार बळ उडाली आहे. अटक केलेल्याचे नाव आहे जितेंद्र सतीशकुमार दुवा (वय ४०, सध्या रा. ड्रीम्स निवारा सोसायटी, ऊरळी कांचन) या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार योगेश मोहिते, मारूती पारधी, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळवे आणि महिला पोलीस अंमलदार रेहाना शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.