प्रेस मीडिया लाईव्ह :
अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड दि.९ देहूगाव अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला पॉलिश , झळाळी देण्याचे काम जोरात होत आहे.
सोहळ्या बरोबर नेण्यात येत असलेली आभूषणे, अब्दागिरी, चौपदाराचे दंड, गरुडटक्के, समया, विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील महिरप, मंदिराच्या गर्भगृहाच्या चौकटी, दरवार्ज, अभिषेकाचे व पूजेचे थाळ, चौरंग, चोपदाराचा चांदीचा दंड आदी साहित्यालाही झळाळी दिली जात आहे. यासाठी एक पोते लिंबांचा रस, ४० किलो चिचेचे पाणी. २० किलो रिठा, ४० किलो धुण्याचा सोडा ३० लिटर रसायनांचा वापर करण्यात येत आहे. सेवाभावी वृत्ती पुण्याच्या रविवार पेठेतील कमर आत्तार, अनस आत्तार, उमर शेख, उमर आत्तार, रिहान आत्तार, महम्मद हुसेन आत्तार, इस्माईल आत्तार, शेहजान आत्तार या कर्मचाऱ्यांनी हे काम 1 सेवाभावी वृत्तीने केले आहे.