जगभरातील २५ नामांकित विद्यापीठांपैकी भारतामधून पीसीसीओई संघाचा सहभाग
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : (दि. २८ जून) - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग(पीसीसीओई) मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी जगभरात दूरसंचार क्षेत्रात अग्रमानांकित कंपनी म्हणून लौकिक असणाऱ्या टीई कनेक्टिव्हिटी द्वारे आयोजित 'एआय चषक २०२२-२३' वर आपले नाव कोरले.
या संघातील कार्तिक चौधरी, सुरज ताडे, सृष्टी खैरवाडकर, हिशीता ठक्कर यांनी बेस्ट बिझनेस इम्पॅक्ट या विभागात जगभरातील नामांकित २५ विद्यापीठातील ४० संघांमधील २०२ विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून हे यश संपादन केले. विशेष म्हणजे संपूर्ण भारतातून केवळ पीसीसीओईचा संघ सहभागी झाला होता. हा संघ विजयी झाला.
'व्हिजन इन्स्पेक्शन: डीटेक्शन ऑफ मॉडलींग डिफेक्टस् इन द प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर बाय टीई कनेक्टिव्हिटी' या विषयावर त्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. दि.१६ ते १९ मे २०२३ दरम्यान ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे विजेते ग्लोबल ज्युरी मेम्बर्स द्वारे घोषित करण्यात आले.
'एआय' चषक विजेत्या संघाला प्रा. डॉ.सुदीप थेपडे, अधिष्ठाता क्वालिटी अशूरन्स (पीसीसीओई) यांचे मार्गदर्शन लाभले. जागतिक स्तरावरील नामांकित स्पर्धेत भारताचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल प्रा. डॉ. सुदीप थेपडे आणि विजेत्या संघाचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे यांनी अभिनंदन केले.