पिंपरी चिंचवड करसंकलन विभागातील सचिन वाझे कोण ?

 बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने एका राजकीय पक्षासाठी फंडिंग वसुली.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक भ्रष्टाचारची प्रकरणे बाहेर निघतात त्यावर स्थानिक वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स बनतात . कालांतराने वृत्तपत्रातून विषयच गायब होतो . राजकीय वजन असेल किंवा कागदावरील वजन असेल त्या वजनामुळे सगळं दबून जात . विरोधी पक्ष तात्पुरती स्टंटबाजी करतात चहापाण्याची सोय झाली कि चिडीचुप  होतात . पान टपऱ्यांवर , चहाच्या कट्ट्यावर चर्चा रंगतात आणि  पाहता पाहता ते प्रकरण गायब होते. चोरी करणारा आणि चोरी पकडणारा दोन्ही नकळत नजरेआड होतात .काही दिवसांनी अशा भ्रष्टाचारच्या प्रकरणावर पडदा पडतो . 

 पिंपरी चिचंवड महापालिकेत ऑगस्ट २०२१ मध्ये लाचलुचपत विभागाने धाड टाकून रंगेहाथ पकडलेले स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आली होती . परंतु पार्टी विथ डिफरंस म्हणवून घेणाऱ्या पक्षानें स्थायी समिती अध्यक्षांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

▫️ *प्रशासकीय काळामध्ये सुद्धा ठेकेदारांकडून अधिकारी व कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार आल्यानंतर २१ मार्च २०२३ मध्ये लाचलुचपत विभागाने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये धाड टाकली व तेथील लिपिकास ताब्यात घेतले.तसेच ७ जून २०२३ रोजी उद्यान विभागातील सहाय्यक निरीक्षक किरण अर्जून मांजरे हा उद्यान विभाग कार्यालयातच १७ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला.

 या सर्व प्रकरणा मध्ये सापडलेल्यां पैकी मोठे मासे मात्र नामनिराळे राहिले आहेत . अशाप्रकारे पिंपरी चिंचवड *महापालिका हे भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून सर्वच विशेषतः सत्ताधारी पक्षाचे नेते अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना अभय देत असल्याने , आयुक्तांची सुद्धा त्या नेत्यांसमोर काही चालत नसल्याचे दिसत आहे. हे ठराविक अधिकारी पालिकेचे जावई बनल्यासारखे मिरवत आहेत , असाच एक करसंकलन विभागातील अहंकारी , भ्रष्ट अधिकारी राजकीय वरदहस्तामुळे सर्रासपणे नियमांची पायमल्ली करून मनमर्जी कारभार करीत आहे. अशा अधिकाऱ्यांना मिळणारा पगार हा सामान्य जनतेच्या करातून मिळतो याची जाणीव अशा अधिकाऱ्यांना नाही. हे जनतेचे सेवक आहेत परंतु देशाची मालक असलेल्या जनतेला गृहीत धरून मनमानी कारभार करीत आहेत.

      महापालिकेचे आर्थिक नुकसान करत नियमबाह्य, बेकायदेशीर कामकाज करणा-या करसंकलनच्या दोषी अधिकारी- कर्मचा-यांचे  विभागीय चौकशीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने महापालिकेशी अनेकवेळा पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला. आयुक्तांच्या दालनातील बैठकीत कारवाई करण्याचे आश्वासन देणारे शेखर सिंग " त्या " गब्बरसिंग नेत्याच्या दबावामुळे चक्क पलटले आणि एक लाचखोर अतिरिक्त आयुक्तांनी तर सरळ हात वर करत " Boss is always right "* असे म्हणत हे प्रकरण आयुक्तांकडे ढकलले . याचा सरळ अर्थ स्पष्ट आहे भ्रष्टचारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी नेत्यांच्या घरी पाणी भरणारे आणि जनतेला वेठीस धरून हराम कमाई करून स्वतःचे घर भरणारे हे अधिकारी देशद्रोहीच म्हणावे लागतील . संविधानाने दिलेल्या अधिकारचा गैरवापर करून असंवैधानिक कामे करीत आहेत.करसंकलन विभागामध्ये होत असलेल्या चुकीच्या व नियमबाह्य गोष्टींमध्ये  विकेंद्रीकरणाचा निर्णय रद्द , नोटराइज्ड दस्ताद्वारे मिळकत नोंदणी , नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मिळकतीची नोंद नाही त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान, ओरिअन्स प्रो सोल्युशन्स कंपनीचा बोगस सर्व्हे ,एकाच दस्तावर ३१ नोंदी , अनेक व्यावसायिकांचा कोट्यवधींचा कर माफ , सामान्य नागरिकांकडून वसुली आणि मोठ्या व्यावसायिकांना सबुरी अशी अनेक प्रकरणे महापालिकेचे सर्वाधिकार असलेल्या प्रशासकांसमोर असताना त्याला अभय दिले जात आहे. आणि तो जनतेचा नोकर असलेले परंतु स्वतःला मालक समजत असलेला अधिकारी अशा अनेक प्रकरणातून एका राजकीय पक्षासाठी निवडणुकीचे फंडिंग जमा करतोय अशी सर्वत्र चर्चा आहे .

 एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचा आशीर्वाद असल्यानेच बिनधीकतपणे वसुली करतोय , त्यामुळे हा अधिकारी महापालिकेतील करसंकलन विभागातील सचिन वाझे आहे ❓ असं काही अधिकारीच खाजगीत सांगतात . तो सचिन वाझे कोण आहे ❓  त्या वाझेंला कोणाचा वरदहस्त आहे ❓ मुख्यमंत्री आणि सध्या तरी निष्कलंक असलेले गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस  त्या सचिन वाझेंवर कारवाई करतील काय ❓ हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे .*

 हि बातमी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली असेल असे आम्ही गृहीत धरतो आणि पोहचली नसेल तर त्यांच्या प्रामाणिक  व भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्यांनी हि गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी . 

 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्या नेत्याचे कान टोचतील व करसंकलन विभागातील त्या सचिन वाझेंवर नक्कीच कारवाई करतील अशी खात्री बाळगायला हरकत नाही.


🖋️ लेख शब्दांकन :-

सिद्दिक शेख

अध्यक्ष अपना वतन संघटना

Post a Comment

Previous Post Next Post