... या महाविद्यालयास आय एस ओ मानांकनाची हार्ड कॉपी मिळाली


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव .या संस्थेची स्थापना सन 1986 साली झाली. कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठवडगाव या महाविद्यालयाचे आयएसओ मानांकनासाठी  रिमोट ऑडिट पाच व सहा जून  2023 ला झाले होते .त्यानुसार सात जून 2023 ला आयएसओ मानांकनाची सॉफ्ट कॉपी मिळाली होती. 21 जून 2023 रोजी महाविद्यालयास आय एस ओ मानांकनाची हार्ड कॉपी मिळाली आहे . 

ISO -(International Organisation for Standardization.) ही एक राष्ट्रीय मानक संस्था आहे.तंत्रज्ञान  , वैज्ञानिक चाचणी प्रक्रिया, कामाची परिस्थिती, सामाजिक समस्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शैक्षणिक उपक्रम, विशेष उद्देशावर आधारित उपक्रम, विविध स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग, शिक्षक व्यावसायिक विकास, विविध अध्यापण पद्धती, तंत्रे यांचा वापर, विविध विषयांच्या कार्यशाळा,ICT,Activity based teaching learning process , विविध क्षमता,कौशल्ये, व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अशा अनेक गोष्टीं आंतरराष्ट्रीय  मानकांच्या विकासात सहभागी होतात.महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती आर.एल.निर्मळे  मॅडम या नेहमी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देतात.

या महाविद्यालयातून शिक्षण घेवुन बाहेर पडलेले सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदा वरती कार्यरत आहेत.महाविद्यालयाच्या इमारती मध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.महाविद्यालयाचा परिसर, वातावरण स्वच्छ व सुंदर आहे. या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक स्टाफ हा गुणवत्तापूर्ण आहे. तसेच इथे घडणारे भावी शिक्षक हे सर्व क्षमता कौशल्ये व गुणवत्तापूर्ण घडविले जातात.

कॉलेज ऑफ एज्युकेशन बी. एड पेठवडगाव, या महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे आर.एल यांच्या मार्गदर्शनातून व प्रयत्नातून महाविद्यालयास आय एस ओ मानांकन प्राप्त झाले. संस्थेचे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे मॅडम, प्राध्यापक शिरतोडे ,प्राध्यापक सोरटे ,प्राध्यापक जाधव, प्राध्यापक चरणकर ,ग्रंथपाल चौगुले , ग्रंथालय सहाय्यक प्रेरणा पाटील ,ओएस चव्हाण शिक्षकेतर कर्मचारी पोपट धनगर व बबलू कांबळे  व सर्व विद्यार्थ्यांचे  महाविद्यालयास ISO मानांकन मिळाल्याबद्दल कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post