प्रेस मीडिया लाईव्ह :
नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर झाली असून लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक / अध्यक्ष तसेच नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा सचिव विरेंद्र यशवंत म्हात्रे यांची जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी जाहीर केले.
विरेंद्र म्हात्रे हे नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव असताना पक्षाच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेत होते. समाजाशी बांधिलकी जपत विविध सामाजिक उपलब्ध त्यांनी राबविले आहेत. शासकीय आस्थापनाकडे सातत्याने पत्रव्यवहारात करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मा. नामदेव भगत, नवी मुंबई जिल्हा अल्पसंख्याक चे जिल्हा अध्यक्ष मालदा साहेब उपस्थित होतो.