प्रेस मीडिया लाईव्ह :
नांदेड : प्रतिनिधी : -
नांदेड जिल्ह्यात शिवसेना आल्यसंख्याक आघाडी (गाव तेथे शाखा ) हा उपक्रम राबवण्या साठी नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्याची भेटी दरम्यान दौरा गेल्या पंधरवाड्यात पूर्ण झाला आहे.
शिवसेनेचा दि.19 जुन च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशन्यूवे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेेब व नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात साहेेब यांच्या सुचनेचा आदर करत दि . 26 जून 2023 पासून ते 24 जुलै 2023 ह्या एक कालावधीत प्रत्येक गाव, तालुका, शहर येथे झंजावात दौरा करून शिवसेना आल्पसंख्याक आघाडी उभी करण्याचे काम पायाला भिंगरी बांधुन शिवसेना घरोघर पोहचून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या 27 जुलै च्या वाढदिवसाची भेट म्हणून नांदेड जिल्ह्यातून जास्तित जास्त आल्पसंख्याक समाज शिवसेनेेत प्रवेश करून घेऊन आल्प संख्याक समाज शिवसेनेच्या पाठीशी किती ऊभा आहे.
या कार्याचा लेखा - जोखा पक्ष प्रमुखाना वाढदिवसांंची भेट म्हणून देणार आहे असा ठाम निच्छय उराशी बाळगुन दि . 26 जून 2023 पासून नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक गावात दौरा करणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक पाईक शिवसैनिक कार्यकर्ता या नात्याने व नांदेड शिवसेना आल्पसंख्याक आघाडी जिल्हा प्रमूख म्हणुन या कार्याला गती देण्याचे काम करून जिल्ह्यात जास्तीत शिवसेना अल्पसंख्याक आघाडी सदस्य नोंदनी करणार असल्याचा संकल्प हर घर शिवसेना हा उपक्रम या दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेना भक्कम करण्याचा ठाम निच्छय जैनोदीन पटेल यांच्या कडून करण्यात आला आहे.