राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या मागण्या संदर्भात,

  महाराष्ट्र कामगार मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्याकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे शिष्टमंडळाला दिले आश्वासन .             



प्रेस मीडिया लाईव्ह :                    

मुंबई (प्रतिनिधी) : 

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र यांच्यावतीने, महाराष्ट्र कामगार मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची शिष्टमंडळाच्या वतीने नुकतीच सदिच्छा भेट घेणेत आली. 

यावेळी कोल्हापूर येथे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडले असून, त्यामध्ये गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थींच्या मागण्या संदर्भात ठराव पारित करण्यात आले होते. त्या ठरावांच्या अनुषंगाने कामगार कल्याण आयुक्त यांची शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेऊन चर्चा करणेत आल्या. 

यावेळी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी मागण्यांचे / ठरावाचे वाचन केले. त्यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी मागण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे झालेल्या बैठकीत शिष्ठमंडळाला आश्वासन दिले.                     

यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आमदार, खासदार, पालकमंत्री व मंत्री महोदय यांनाही आपल्या ठरावाच्या निवेदनाच्या प्रती असोसिएशनच्या स्थानिक प्रतिनिधींच्यावतीने देत आहोत, असे कल्याण आयुक्त रविराज इळवे साहेब यांना सांगण्यात आले असून, या शिष्टमंडळात राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष केरबा डावरे, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, ठाणे जिल्हाध्यक्ष भरत सकपाळ, ठाणे विभाग प्रमुख चंद्रकांत मोरे, दत्तात्रय शिरोडकर (मुबंई उपनगर सहचिटणीस व मुबंई उपनगर जिल्हा नियोजन समिती सदस्य) व पदाधिकारी उपस्थित होते.   

या बैठकीच्या वेळी महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांचा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, दिल्ली येथे राष्ट्रीय नागरी एवं पर्यावरण संरक्षण मंत्रालय भारत सरकार यांचेवतीने पर्यावरण मंत्री ना. आश्विनकुमार चौबे व सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या हस्ते "नॅशनल इन्व्हॉर्नमेंटल ॲवॉर्ड" मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेबद्दल कामगार कल्याण आयुक्त यांच्यावतीने सुरेश केसरकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचे पुस्तक देऊन त्यांचा गौरव केला. तसेच मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यावतीने सुद्धा त्यांचा शाल व पुष्प  गुच्छ देऊन स‌त्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

सदर सत्कारास उत्तर देताना, राजाच्या प्रशासकीय प्रमुखांच्यावतीने व सहकाऱ्यांच्यावतीने झालेला सत्कार हा माझ्या आयुष्याला निश्चितच उभारी देईल व आणखीन ज्यादा भरीव कामगिरी करण्यास  बळ देईल असे सुरेश केसरकर यांनी सांगितले.

सदर चर्चेदरम्यान मंडळातील अनेक बंद असलेल्या योजना पुर्ववत सुरु करणेबाबत तसेच मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जादा निधी मंजूर करणेबाबत असोसिएशनच्या वतीने आग्रही मागणी करणेत आली.

Post a Comment

Previous Post Next Post