प्रेस मीडिया लाईव्ह :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर शिंदे
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक भव्य दिव्य अशा स्वरूपाचे मिरज छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक येथे नव्याने तयार करण्यात आलेला आहे यासाठी माजी सभापती निरंजन आवटी माजी महापौर संगीता ताई खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने नगरसेवक गणेश माळी सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कल्लोळी यांच्या माध्यमातून व राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती व मराठा क्रांती मोर्चा अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या पाठपुराव्याने भव्य दिव्य असे स्मारक तयार करण्यात आलेले आहे .
यावेळी पालकमंत्री व कामगार मंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचे हस्ते लोकार्पण सोहळा व जयंती साजरी करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विलासरावजी देसाई सामाजिक कार्यकर्ते सचिन दादा जाधव महादेवराव नलवडे नरेंद्र मोहिते महाराज वस्ताद किरण भुजबुडे विजयराव धुमाळसर मदन तांबडे अमृतराव सूर्यवंशी बाळासाहेब निपाणी पाटील दयानंद खोत अनिल लोहार आर जी भोसले अशोक पाटील कोकळीकर प्राचार्य प्रमोद इनामदार तसेच खाणीवरील विठ्ठल मंदिर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून प्रतिमा पूजन करण्यात आलं, जिल्हाध्यक्ष अभिजीत शिंदे जिल्हा खजिनदार विजयराव शिंदे व विविध मान्यवर तसेच जिजाऊ चारिटेबल संस्थेच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली संस्थापक अध्यक्ष धनंजय भिसे संजय मेथे जगदीश धुळूबुळू विवेक उर्फ पप्पू शिंदे डेव्हलपमेंट फॉरम यांच्यावतीने ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले फोरमचे अध्यक्ष शितल कदम उपाध्यक्ष प्रकाश साबळे सचिव दादासाहेब कांबळे व सर्व सदस्य यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली