19 मे ला प्रेस मीडिया लाइव्हने प्रसिध्द केलेल्या बातमीचा जोरदार इफ़ेक्ट .
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- दोघांच्या वादात तिसऱ्यांचे नुकसान हद्दीचा वाद टॉऊन हॉल एसटी बस स्थानकाकडे संबंधित अधिकारयांचे दुर्लक्ष ही बातमी प्रथम प्रेस मीडिया लाईव्ह ने 19 मे ला प्रसिध्द केली होती.
प्रवाशांनीही या बाबत पाठ पुरावा केला होता.त्या नंतर काही वृत्तपत्र तसेच काही न्यूज चॅनलने ही या बाबत आवाज उठवला होता.या सर्वाच्या बातमीने एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकारयांनी या वृत्ताची तातडीने दखल घेऊन दिनांक 7 जून पासून टॉऊन हॉल एसटी बस स्थानकाच्या नुतिनीकरणाला सुरुवात केली आहे.
याबाबत प्रवासी वर्गातुन समाधान व्यक्त करुन याबाबत प्रथम प्रेस मीडिया लाईव्हने आवाज उठवल्या बद्दल प्रेस मीडिया चे प्रवाशांनी अभिनंदन केले आहे.