प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -हातकंणगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथे रहाणारे नितीन बापू मोरे याने नात्यातील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवुन नेऊन लग्न केले होते.सदर पीडीत मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही तिच्याशी शारीरीक संबंध ठेऊन तिला दिवस जाऊन मूल ही झाले.
या दरम्यान तिचा सासरी पतीसह सासरच्या मंडळी कडुन शारीरीक आणि मानसिक छळ होऊ लागला याला कंटाळून पीडीत मुलीने अखेर बाल कल्याण समितीकडे धाव घेऊन आपली व्यथा मांडली.त्या नुसार पीडीत मुलीचा पती,सासू सासरे यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती नितीन बापू मोरे,सासरा बापू मोरे आणि सासू सीता बापू मोरे (रा.पु.शिरोली). अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.