प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : गझलसाद संस्थेच्या वतीने आद्य मराठी गझलसंशोधक आणि ज्येष्ठ गझलकार प्रा. डॉ.अविनाश सांगोलेकर (पुणे ) यांचा ' अविनाशपासष्टी ' हा गझलवाचनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला अर्थात रविवार ता.२५ जून २०२३ रोजी सायं.५ वाजता - "घर नागेशकरांचे",श्री सुभाष नागेशकर, ११४१, साईक्स एक्स्टेंशन,जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या महालक्ष्मी हॉल समोर,कोल्हापूर येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास कोल्हापूर व परिसरातील गझल, काव्य, साहित्य रसिकांनी यावे असे आवाहन गझलसाद संस्थेच्या वतीने निमंत्रक प्रा.नरहर कुलकर्णी (९४०३८ ४४१९० ) यांनी केले आहे.