गोकुळ वृत्तपत्र विक्रेत्यांचे ऋणानुबंध जपेल... मा.श्री.अरुण डोंगळे

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्‍हापूर:ता.०१ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)च्‍या वतीने कोल्हापूर शहरातील विविध भागातील वृत्तपत्र विक्रेते यांना जागतिक दुग्ध दिनानिमित्ताने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक यांच्या उपस्थितीमध्ये सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले.     

   यावेळी बोल‍ताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्त्वाचे स्थान आहे. आपण झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात, तेही पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता. या विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे

याबद्दल जागतिक दुग्ध दिनानिमित्त त्यांना गोकुळमार्फत त्यांना सुगंधी दूध,टी शर्ट,टोपी यांचे वाटप करण्यात आले.गोकुळचे वृतपत्र विक्रते संघटनेस नेहमीच सहकार्य राहील व गोकुळ वृत्तपत्र विक्रेत्यांचे ऋणानुबंध जपेल असे मनोगत व्यक्त केले.

    यावेळी वृत्तपत्र विक्रते राज्य संघटनेचे विभागीय सचिव रघुनाथ कांबळे बोलताना म्हणाले कि गोकुळ महाराष्ट्रामध्ये अग्रणी दूध संघ असून गोकुळने नेहमीच सामजिक क्षेत्रात अनेक घटकांना सहकार्य केले आहे. त्याच पद्धतीने आज आयोजित केलेला जागतिक दुग्ध दिनानिमित्त सुगंधी दूध वाटप कार्यक्रम हा आमच्यासाठी आयोजित केलेबद्दल गोकुळ परिवाराचे आभार मानले.भाऊसिंगजी रोड, राजारामपुरी, कावळा नाका, संभाजी नगर या ठिकाणच्या वृतपत्र विक्रेत्यांनाहि दुधाचे वाटप करण्यात आले.

          या कार्यक्रमाचे स्वागत वृतपत्र विक्रते जिल्हा अध्यक्ष किरण व्हनगुत्ते यांनी केले. आभार रणजीत आयरेकर यांनी मानले.

चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके , चेतन नरके, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील,उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, तसेच वृतपत्र विक्रते जिल्हा अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, रणजीत आयरेकर,रघुनाथ कांबळे,सुरेश ब्रह्मपुरे, सतीश दिवटे, सुरेंद्र चौगले, समीर कवटेकर, धनंजय शिराळकर, अंकुश परब, इंद्रजीत पवार, राजराम पाटील, नामदेव गोंधळी, रवी लाड, परशुराम सावंत, सतीश पाटील, रवी गवळी, कृष्णा पाटील, राजू पवार,अजय साठे , संदीप शेळके  व इतर वृत्तपत्र विक्रेते आदि उपस्थित होते.


फोटो ओळ – यावेळी दूध वाटप करताणा संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके , चेतन नरके, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील,उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, तसेच वृतपत्र विक्रते जिल्हा अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, रणजीत आयरेकर,रघुनाथ कांबळे,सुरेश ब्रह्मपुरे, सतीश दिवटे, सुरेंद्र चौगले, समीर कवटेकर, धनंजय शिराळकर, अंकुश परब, इंद्रजीत पवार, राजराम पाटील, नामदेव गोंधळी, रवी लाड, परशुराम सावंत, सतीश पाटील, रवी गवळी, कृष्णा पाटील, राजू पवार,अजय साठे , संदीप शेळके  व इतर वृत्तपत्र विक्रेते आदि दिसत आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post