प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : राजारामपूरी येथे गर्भलिंग निदान करणाऱ्या श्री हॉस्पिटलवर आज पोलिसांनी छापा टाकून जोरदार कारवाई केली आहे. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडीयावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा आज सर्वत्र शहरात सुरू आहे.
या बाबत मिळालेल्या माहीती नुसार ,राजारामपूरी येथील श्री हॉस्पीटल मध्ये सोनोग्राफी मशीन बंद असल्याचे दाखवून गर्भलिंगनिदान केले जात होते. या कारवाई दरम्यानचा व्हिडियो व्हायरल झाला झाला आहे या मध्ये श्री हॉस्पीटलचे डॉक्टर गर्भलिंगनिदानासाठी 15 हजार घेताना दिसत आहेत . पोलीसांनी डॉक्टरांना 15 हजार घेताना रंगेहाथ पकडले असून हॉस्पीटल वर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू आहे