स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढलेने मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. महेंद्र पंडीत यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यांना प्रतिबंध होवून मोटर सायकल चोरीचे घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून कारवाई करणे करीता विशेष मोहिम राबविणे बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या.
मा. पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांनी त्यांचे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अमलदार युवराज पाटील, सुरेश पाटील, सागर माने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे व प्रविण पाटील यांचे तपास पथक तयार
करून त्यांना घडलेल्या गुन्ह्यांचे ठिकाणी भेटी देवून गुन्ह्याची पध्दत व तांत्रिक दृष्ट्या तपास करून तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे सदर पथकाकडून मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न सुरू असताना आज दि. 29.06.2023 रोजी पथकातील पोलीस अंमलदार युवराज पाटील व सागर माने यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, जुना राजवाडा पोलीस ठाणे, गु.र.नं. 337/2023, भा.द.वि.स.क. 379 प्रमाणे दाखल गुन्हा हा आरोपी निलेश सावंत, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर याने केला असुन तो सदर गुन्ह्यातील चोरलेली सिल्व्हर रंगाची पल्सर मोटर सायकल घेवून आज दि.29.06.2023 रोजी तपोवन मैदानावरील शाळेजवळ येणार आहे.
मिळाले माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील वर नमुद तपास पथकाने तपोवन मैदान परिसरातील शाळेजवळ सापळा लावून आरोपी नामे निलेश बाबासो सावंत, व. व. 36, रा. 1539, सिध्दाळा गार्डन जवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर यास त्याचे कब्जातील पल्सर मोटर सायकलसह ताब्यात घेतले.
नमुद इसमाचे कब्जात मिळाले मोटर सायकलबाबत अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात मिळालेली पल्सर •मोटर सायकल ही चोरीची असून त्याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाणे, गु.र.नं. 337/2023, भा.द.वि.स.क.379 प्रमाणे गुन्हा दाखल असलेचे निष्पन्न झाले. म्हणून नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने गेले दोन ते अडीच महिन्यांपूर्वी पासून कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून डुप्लीकेट चावीचा वापर करून आणखी 08 मोटर सायकल चोरलेची कबुली दिलेने त्याचे माहितीने चोरीच्या 09 व
गुन्हा करणे करीता वापरलेली 01 अशा 5,35,000/- रूपये किंमतीच्या एकूण 10 मोटर सायकल जप्त केल्या आहेत. आरोपी कडून जुना राजवाडा पोलीस ठाणे- 05, शाहुपूरी पोलीस ठाणे 03 व लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे- 01 असे गुन्हे
उघडकीस आले आहेत. आरोपी हा सध्या काहीएक कामधंदा करीत नसून तो कर्जबाजारी आहे. त्यामुळे चोरीच्या मोटर सायकल विकून त्यातून मिळणारे पैशांतून त्याचेवर असलेले कर्ज भागवून उरलेल्या पैशांतून चैनी करणेच्या उद्देशाने त्याने सदरच्या मोटर सायकली चोरल्या असलेची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई करीता जुनाराजवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे..
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. महेंद्र पंडीत, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्री. निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोली स उपनिरीक्षक विनायक सपाटे तसेच पोलीस अंमलदार युवराज पाटील, सुरेश पाटील, सागर माने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, प्रविण पाटील व संतोष पाटील यांनी केली आहे.