प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : जोतिबा बसस्थानक व्यवस्थापनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात जोतिबा बसस्थानकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जोतिबा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी मा .कृष्णात बुणे यांचे हस्ते एस .टी. चे पुजन करून साखर पेढे वाटप केले . यावेळी एसटीच्या डिजिटल फलकांचेही पुजन करण्यात आले . यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोषाध्यक्ष श्री. दत्तात्रय धडेल , पन्हाळा तालुक्यांचे संघटक श्री . दत्तात्रय मिटके, जोतिबा बसस्थानकांचे वहातुक नियंत्रक एस.आर.सणगर, कार्यक्रमास उपस्थिती होते. एसटीला आकर्षक केळीच्या पानाने सजावट करुन फुगे लावले होते .यावेळी वाहतुक नियंत्रक, कर्मचारी, चालक, वाहक, सेवक, एस टी चा कणा असलेल्या प्रवासी ग्राहक यांचा सत्कार करून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या .