प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.कांदबरी बलकवडे यांची बदली झाल्याने महापालिकेत निरोप समारंभ आयोजित केला होता.अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसुळ आणि उपायुक्त शिल्प दरेकर यांच्या हस्ते डॉ.बलकवडे यांचा सत्कार करण्यात आला.डॉ.बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात शहरात लस्सीकरण मोहिम यशस्विपणे राबविण्यात आली.
तसेच संजीवनी अभियान राबवुन रुग्णावर उपचार करता आले.महापुरातही डॉ.बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करण्याची संधी मिळाली.असे आडसुळ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.शहरातील प्रश्न मार्गी लावण्या बरोबरच कर्मचारी यांचा हितालाही प्राधान्य देऊन उतपन्नवाढ़ी बरोबर शासनाच्या योजना सर्ब सामान्य लोकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी डॉ.बलकवडे यांनी विवीध उपक्रम राबवण्यात आले.यांच्या मुळेच कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल स्थान पटकाविले.डॉ.बलकवडे यांनी अधिकारी ,कर्मचारी ,नगरसेवक आणि नागरिकांच्या सहकार्याने शहरात विकास कामे करता आल्याचे सांगितले.या वेळी सर्व विभागातील अधिकारी,कर्मचारी हजर होते.