प्रा सौ प्रमोदिनी माने यांना पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ.प्रमोदिनी माने
कोडोली येथे दिनांक ३१मे रोजी अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रतेक ग्राम पंचायत मधील दोन कर्तबगार महिलांचा सत्कार आयोजित केला होता .
कोडोली ग्रामपंचातमध्ये प्रा सौ प्रमोदिनी माने मॅडम यांनी तनिष्का ग्राहक पंचायत प्रविणा फोडेंशन या माध्यमातून समाजात महिलांसाठी अहोरात कोणताही मोबदला न घेता स्वखर्चाने सामाजिक कार्याची दखल घेतली व शासनाने जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार त्यांना मिळाला .
याप्रसंगी ग्रामपंयात सर्व सदस्य सरपंच सौ भारती पाटील ग्रामविकास अधिकारी उपसंरपंच मा श्री प्रविण जाधव . अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या या स्वीच्याउपस्थीत प्रा सौ प्रमोदिनि माने मॅडम व सौ शिर्के मॅडम यांना पुरस्कार देण्यात आला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ संध्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले माने मॅडम यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आढावा सांगितला मा श्री प्रविण जाधव यांनी शुभेच्छा दिल्या भारती पाटील यांनी आभार मानले