11 जनावरे ताब्यात .जयसिंगपुर पोलिसांची कारवाई ..
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- जयसिंगपूर ,हातकंणले ,शिरोळ तालुक्यातील शेतकरयांची जनावरे चोरीस गेल्याच्या घटना घडत होत्या.या प्रकरणी तक्रारीही संबंधित पोलिस ठाण्यात दाखल केल्या होत्या.शिरोळ तालुक्यातील निमशिरगांव येथील शेतकरी अविनाश अनिल कोडोले (रा.तोरणानगर,निमशिरगांव). जर्शी जातीची गाय चोरीस गेल्याची तक्रार जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दाखल केली होती ,
याचा तपास करीत असताना पो.कॉ.रोहीत डावाळे यांना खबरया मार्फत माहिती मिळाली की,ही चोरी युवराज मल्लाप्पा तेली (रा.इंचलकंरजी).आणि राहुल यमनाप्पा सनगुंडे (रा.दत्तनगर ,इंचलकरंजी ).या दोघां जणानी चोरी केल्याची माहिती मिळाली असता त्या दोघांना अटक करून अधिक चौकशी केली असता त्यांनी हातकंणले ,शिरोळ, जयसिंगपूर आणि निमशिरगांव आदी गावातील जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी 4 लाख 70 हजार रुपये किमंती 11 जनावरे ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली.या चोरी प्रकरणात एका महिलेचाही समावेश असून त्या महीलेला अटक केली नाही .ही कारवाई कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक मा.श्री.महेंद्र पंडीतसो ,अप्पर पोलिस अधीक्षक मा.श्री.निलेश खाटमोडे -पाटीलसो यांच्या मार्गदर्शनाखाली ,जयसिंपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित पाटीलसो ,मपोकॉ.प्रभावती सावंत,पो.कॉ.डावाळे ,अमोल अवघडे ,हो.बेडगकर यांनी केली.