जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशा घोषणा देत महापुरुषांच्या जयजयकारात आजची रॅली उस्फुर्तरित्या शांततेत संपन्न झाली.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी कोल्हापूरमध्ये घडत असलेले जातीवादी हल्ले सनातनी मनुवादी प्रवृत्ती यांना कुठेतरी पायबंद घालायचा या दृष्टीने शिव शाहू सद्भभावना रॅलीचे कोल्हापुरात पुरोगामी संघटनांच्या वतीने आयोजन आज दिनांक 25 6 2023 रोजी सायंकाळी केले होते.

 या रॅलीमध्ये छत्रपती शाहू महाराज स्वतः मार्गदर्शन करत होते तसेच आमदार मुश्रीफ साहेब बंटी पाटील साहेब पी एन पाटील साहेब राजू शेट्टी जयंत आसगावकर अशा अनेक मान्यवरांनी या सद्भभावणा रॅलीमध्ये ,सहभाग नोंदवला आणि पुरोगामी कोल्हापूरवर कोणत्याही जातीवादी हल्ल्याचे परिणाम होणार नाही अशाच भावना या लोकांच्या रॅलीला मिळालेल्या भरघोस प्रतिसादातून दिसून येत होते. जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशा घोषणा देत महापुरुषांच्या जयजयकारात आजची रॅली उस्फुर्तरित्या शांततेत संपन्न झाली.आजच्या सद्भभावना रँलीमध्ये, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पदाधिकाऱ्यांनीही हिरीरीने सहभाग नोंदवला

Post a Comment

Previous Post Next Post