......."आणि दाऊदभाईची चहा गाडी पुन्हा रस्त्यावर उभी राहिली .



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

 कोल्हापुर - परवा झालेल्या दंगलीत नुकसान झालेले लहान मोठे व्यावसायिक मंडळी पुन्हा नव्याने मोठ्यां हिमतीने कामाला लागली आहेत. अशा नुकसान ग्रस्त फ़ेरीवाले ,विक्रेते ,व्यापारयांच्या साठी समाजातुन त्यांना पाठबळ देऊन धीर दिला पाहिजे. या दंगलीत लक्ष्मीपुरीतील शाहु टॉकीज समोर असलेल्या दाऊद भाई यांची नुकतीच सव्वा ते दिड लाख रुपये खर्चून नवीन केलेली चहाच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात त्या चहा गाडीचे खालचा आणि वरचा बोर्ड ,कपबश्या ,आणि चहा साठी लागणारयां साहित्याचे अंदाजे 40  ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 




दाऊदभाई हे सर्वाशी मिळून मिसळून वागणारे असून ते सामाजिक कार्यात अग्रेसर असतात .दाऊदभाई यांची गेल्या 65 वर्षांपासून चहागाडी असून दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत राबत असतात. त्यांना या कामात संपूर्ण कुंटुंबिय मदत करतात , हा प्रसंग गेल्या 38 वर्षांत पहिल्यांदाच घडल्याचे सांगतात. त्यांच्या चहा गाडीवर चहा पिण्यासाठी तोबा गर्दी असून सुध्दा ते सर्वाशी अदबीने या सायबा म्हणून चहा देत असतात. दंगलीत चहा गाडीचे नुकसान झालेले पाहुन न खचता त्यातुन सावरुन त्यानी पुन्हा नव्याने चहा गाडी उभी केली आहे.ज्यानी गाडीचे नुकसान केले त्यात त्यांचा तरी काय दोष जे झालं त्याला काही पर्याय नाही.कोणतरी सांगतय ,कोणतरी करतय डोक्याला हात लावून बसण्यात काय अर्थ आहे. म्हणुन 50 हजार रुपये खर्च करुन गाडी दुरुस्त करून नेहमीच्या हास्यमुद्रेने त्यांच्या सहित त्यांना मदत करणारे त्यांचे कुंटुंब हास्यमुद्रेने चहा देण्यात मग्न होते. समाजातिल एकोपा ,चांगुलपणा जपायचा असेल तर एकमेकाला मदत केली पाहिजे. प्रेस मीडिया लाईव्ह  सद्दिव त्यांच्या पाठीशी राहील.

Post a Comment

Previous Post Next Post