केर्ली गावाजवळ मोटारीच्या धडकेत एक ठार .

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर- केर्ली गावाजवळ चारचाकी गाडीने समोरुन दुचाकीला जोराची धडक दिली.या धडकेत दुचाकी स्वार प्रशांत संभाजी भोसले (वय 28 ,रा .सातवे). हा जागीच ठार झाला.आणि मोटारीतील चालकास चौघेजण जखमी झाले.जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

प्रशांत भोसले हा गोकुळ संघात सुपरवायझर होते.सकाळी आळवे   गावातून एका दुध संस्थेला भेट देऊन गोगवे सेंटरकडे जात असताना वाघबीळ घाटाच्या पुढ़े हॉटेल ग्रीन पार्क समोर रत्नागिरी हून कोल्हापूरकडे जाणारया मोटारीने भोसले यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.धडक इतकी जोरदार होती दुचाकीसह प्रशांत याला 40 ते 50 फुट फरफटत नेले.यात दुचाकीचा चक्काचूर झाला असून मोटारीचेही मोठे नुकसान झालं आहे.प्रशांत भोसले यांच्या मागे आई वडील,भाऊ असा परिवार आहे.या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात पडवळवाडीचे माजी संरपंच पंडीत नलवडे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post