प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-बुधवारी रात्री व्हिनस कॉर्नर येथे किरकोळ कारणातुन चाकू हल्ला होऊन त्यात पाच जण जखमी झाले.उपचारासाठी सीपी आर रुग्णालयात दाखल झालेले जखमी परत समोरासमोर आल्याने तेथे ही हाणामारी झाली.जमावाने अपघात विभागात ही मारामारी करुन काचा फोडण्यात आल्या.या सर्वाना पोलिसांनी लाठीमार करीत जमावाला पांगविले.
या घटनेनंतर व्हिनस कॉर्नर ,सीपीआर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.यात काही रिक्षा ,दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.या हल्यात शिवाजी मोरे ,व्यभव मोरे ,आकाश वर्णे (सर्व रा.उत्तरेश्वर पेठ).तर दुसरया गटातील इकबाल शेख ,आणि गुडन शेख (रा.कदमवाडी) .जखमी झाले आहेत.दोघां जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.व्हिनस कॉर्नर परिसरात मोरे यांचे हॉटेल आहे.तर त्याला लागूनच अंडा आम्लेटची गाडी आहे. दुचाकी लावण्यावरुन या दोघांत वाद होऊन हाणामारी झाली.
दरम्यान दोन्ही बाजूनी चाकूसह हातात मिळेल त्या हत्याराने एकमेकावर हल्ला चढवला.कमीतकमी दहा -पंधरा मिनिटे ही हाणामारी सुरु होती.काहीनी अंडा आम्लेटच्या दोन्ही हातगाड्या उलथवुन टाकल्या.ही माहिती मिळताच लक्ष्मीपुरीचे पोलिस सीपीआर मध्ये येऊन त्यांनी सौम्य लाठीमार करीत जमावाला पांगविले.रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.