प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-पुणे -बंगलोर महामार्गावर काल सायंकाळी पाच सुमारास टोपजवळ वाहनाच्या धडकेत सुरेश तुकाराम माने (वय 51रा.मनपाडळे ता. हातकंणगले) याना वाहनाची धडक बसून ते बेशुध्द होऊन पडले होते त्या परिसरातील नागरिकांनी त्याना तातडीने सीपीआर मध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले .
या अपघाताची माहिती मिळताच माने यांच्या नातलगांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती.शवचिकीत्सा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.