अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोल्हापूर यांच्यावतीने, छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी...

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोल्हापूर यांच्यावतीने, छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी  छत्रपती शाहू महाराज यांच्या  समाधीला अभिवादन करून, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही समाधी स्थळाला भेट देणा-या,अभिवादन करणा-या शाहूप्रेमींना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती, यावेळी अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. 

 यावेळी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोल्हापूर शहर अध्यक्षा स्वाती मंगेश काळे, सीमा कांबळे, संगिता बनगे, रेखा कांबळे, अश्विनी कांबळे, आरती काळे, नम्रता कांबळे, विद्या कांबळे इत्यादीं महिलांनी योगदान दिले.

Post a Comment

Previous Post Next Post