प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -निवडे येथील शेतकरी पांडुरंग धोंडिराम पाटील (वय 35).हे ऊसाला पाणी पाजण्या साठी शेतातील विहीरी वरिल मोटर सुरु करण्यासाठी गेले असता त्याचा विजेचा शॉक लागुन मृत्यु झाला.
ही घटना काल सायंकाळी सातच्या सुमारास घडली.त्यांच्या नातेवाईकांनी 108 या रुग्णवाहिकेतुन सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले .मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.शवचिकीत्सा केल्यानंतर पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.त्याच्या मागे आई वडील,पत्नी ,दोन मुले ,भाऊ असा परिवार आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Tags
कोल्हापूर