प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - एखाद्याच्या सुखामध्ये जाता नाही आले तरी चालेल ,पण कोणी संकटात सापडले असेल तर त्या कुंटुंबाला आपल्या कडून जेवढे काही करता येईल तेवढे नक्की करु या उद्देशाने आज जिद्द फौन्डेशनच्या संस्थापिका सौ.गिताजंली डोंबे आणि त्यांच्या सहकारी संगीता कांबळे आणि सोनिया पाटील यांच्या सह एका कुंटुंबाला मदत करण्यात आली आहे.
यात मुलांना शालेय उपयोगी पडेल अशा वस्तू ,कपडे देण्यात आली या कुंटुंबांची दयनीय अवस्था पाहताना मन भरून येऊन डोळ्यात पाणी आले.दोन लहान मुलं आणि आई वडील या सर्वाची जबाबदारी एकट्या वर्षावर पडली असून काही वर्षांपूर्वी कमवत्या भावाचे निधन झाले.आणि वडीलांनाही एक वर्षापूर्वी प्यारेलेसचा झटका आला होता त्यानाही काम जमत नाही.जिद्द फौडेंशन च्या संस्थापिका गिताजंली डोंबे यांनी त्या कुंटुंबाला मोठा धीर दिला आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली.यावेळी पत्रकार मुरलीधर कांबळे हे ही उपस्थित होते.