प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : पाचकटेवाडी (ता. करवीर) येथील ९ वी पास विद्यार्थिनी श्रुती मारुती सुतार (वय १५) हिने बाथरूम मध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाचकटेवाडी येथील श्रुती सुतार ही बोलोली येथील स्वयंभू हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ती नववी पास होऊन दहावीच्या वर्गात जाणार होती. तिने सुरुवातीपासूनच दहावीच्या अभ्यासाचं टेन्शन घेतलं होत. तिच्या वडिलांनी तिला अभ्यासाचं टेन्शन घेऊ नको असे समजाऊन सांगितलं होते .
दरम्यान, काल शाळेचा पहिला दिवस असल्यानं शाळेला जाण्याची ती तयारी करत होती. सकाळी ती अंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेली.परंतु बराच वेळ ती बाहेर न आल्याने वडीलांनी बाहेरुन हाक मारली असता तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दरवाजा तोडून बाथरूम मध्ये प्रवेश केला असता तिने साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचं समोर आलं. तिला बेशुद्ध अवस्थेत कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.