प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - करवीर तालूक्यातील बालिंगा येथे भर दिवसा मोटार सायकल वरुन आलेल्या चौघा दरोडेखोरांनी गोळीबार करुन सराफ दुकानावर पावणे दोन कोटीचा दरोडा टाकला.दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात आणि मारहाणीत दोघे जण जखमी झाले.याच्यांतील दुकान मालकाची प्रकृती गंभीर आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत केयद झाला आहे.सांगली ची घटना ताजी असतानाच आज कोल्हापुरात दरोडा पडल्याने सराफ दुकानदारांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.बालिंगा येथे राजस्थान येथील सराफ व्यावसायीक रमेश शंकरजी माळी यांचे सराफ दुकान असून ते आपल्या दुकाणात त्यांचे मेव्हणे जितू मोडाजी माळी यांचासह दुकानात होते.आज दुपारच्या वेळी चौघा दरोडेखोरांनी या दोघाना मारहाण करून गोळीबार केला त्यात जितू गोळीबारात जखमी झाले असून रमेश माळी यांच्या डोक्यात बेसबॉल स्टिकने मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत.
दरोडेखोरांनी तीन किलो वजनाचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख असा पावणे दोन कोटीचा मुद्देमाल लुटून पोबारा केला.जाताना दरोडेखोरांनी दुकानच्या बाहेर येऊन गावकरयांच्या दिशेनेही गोळीबार करीत गावच्या दिशेने पळून गेले.त्यानंतर माळी कुंटुबीय घटना स्थळी येऊन जखमीना खाजगी रुग्णालयात दाखल करून पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिस घटना स्थळी दाखल झाले .त्यानी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला.अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनीही घटना स्थळाची पाहणी केली.