प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कोल्हापूरात बंद पुकारुन हिंदुत्ववादी संघटना कडुन शिवाजी चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले होते. या वेळी काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करून लक्ष्मीपुरी परिसरात एक ते दीड कोटीचे नुकसान केले आहे.या मध्ये 14 रिक्षा ,6 दु चाकी ,25 दुकानासह एका टपरीचा समावेश आहे. यावेळी झालेल्या दगडफेकीत लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक श्री.श्रीकृष्ण कटकधोंड यांच्यासह 15 जण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी आता पर्यंत 50 संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी पोलिसांच्या निश्यक्रियतेमुळे सर्व सामान्यांना फ़टका बसल्याची चर्चा आहे. झालेल्या लाठीमार प्रसंगी जो वरिष्ठानी निर्णय घेतला तो योग्य होता असे बोलले जात आहे.या प्रकरणी सर्व चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होईलच पण या प्रकरणी काही पोलिस अधिकारयांचीही उचलबांगडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.