वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळा बाबत न्याय द्या - शरद पवारांना साकडे

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्रात वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सरकारला भाग पाडा असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घालण्यात आले. कोल्हापूर स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते यांनी याबाबतचे निवेदन श्री पवार यांना दिले.

    निवेदनात म्हंटले आहे, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना या एकमेव शिखर संघटनेच्यावतीने सुमारे 15 वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासन दरबारी अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली मात्र अद्याप याबाबत शासन निर्णय घेतला जात नाही.  राज्यात सुमारे चार लाख वृत्तपत्र विक्रेते काम करत आहेत, या सर्वांना न्याय देण्याचे काम आपण करावे. सहाय्यक कामगार आयुक्त (असंघटितकामगार) मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीबाबत माहीती देण्यात आली. त्या समितीने आपल्या अहवालात सेस संदर्भात उपाय सुचवले त्याचा विचार करावा व निर्णय घेऊन कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती करण्यात आली.

श्री पवार यांनी सकारात्मक मत व्यक्त करत संबंधितांकडे याबाबत पाठपुरावा करुन न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post