बाहेरुन बंद आतुन चालू शहर , उपनगरात मटका फोफावला !


 प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर -कोल्हापूर शहरासह उपनगरात ही मटका ,जुगार आणि मसाज ,स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसायाचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित विभागाकडून तात्पुरती कारवाई होते .पण ते तेवढ़या पुरतेच परत येरे माझ्या मागल्या. कोल्हापुरात तर काही ठिकाणी ग्रामीण भागासह खुले आम मटका सुरु आहे. त्या त्या हद्दितल्या कारवाई करणाऱ्याना कुठे दोन नंबर चालू आहे कुठे नाही याची पूर्ण माहिती असते. 

 पण संबंधिता कडुन कारवाई होत नाही .पूर्वी कोल्हापूरला नविन अधिकारी आले की खालचे अधिकारी दबकून असायचे आप आपल्या हद्दितल्या दोन नंबर धंदेवाल्यांना धंदे तात्पुरते  बंद करण्याच्या सूचना दिल्या जायच्या .नविन अधिकारयांना दबकून पाच-सहा महिने धंदा पुर्णपणे बंद ठेवीत असत त्या वेळेला कोणीही धाडस करत नव्हते.आता तर कायद्याचा धाकच राहीला नसल्याचे सर्व सामान्य नागरिकांतुन बोलले जात आहे. काही ठिकाणी तर जुगाराचे अड्डे तर खुलेआम चालू आहेत. तक्रार आली तरच किंवा माहिती मिळाली तरच कारवाई केली जाते.स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांने गेल्या महिना भरात काही ठिकाणी मटका अड्यावर छापा टाकून कारवाई केली होती.मात्र त्यातुन ही पळवाटा शोधून काही मटका मालक मोबाईलवर किंवा ड़ब्बल चिठी द्वारे मटका घेतला जातो.कोल्हापूरात नवीन आलेल्या अधिकारी यांच्या कडून कारवाईच्या नागरिकांकडुन अपेक्षा आहेत .जुगार अड्डा वरिल छाप्या पुर्वीच जुगार खेळत असताना पोलिस आल्याचे समजल्या वरुन पळून जाताना एका तरुणाने टेरेसवरुन ऊडी मारुन अंधाराचा अंदाज न आल्याने जमिनीवरील दगडावर पडून आपला जीव गमवावा लागला.अशीच घटना दोन वर्षा पूर्वी बेकायदेशीर पणे मसाज ,स्पा   चालविणारया महिलेकडे एका महिलेने अब्रुला भिऊन तेथेच दडण्याच्या प्रयत्नात टेरेस वरुन खाली पडून जीव गमवावा लागला होता.

काही जण बेकायदेशीरपणे जाहीरात बाजी करून मसाज,स्पा साठी मुली किंवा महिलाला पाहिजेत वय 20    ते 30 .पगार 10 ते 15 हजार रुपये अशी जाहिरात बाजी करून काही गरजू युवतीची महिलाची फसवणूक करुन त्यांना वाम मार्गाला लावले जाते.या व्यवसायात काही महिला अग्रेसर आहेत.जी महिला हा व्यवसाय चालविते ती महिला धाड पडल्यावर त्याची कारणे ठरलेली असतात नवरा बघत नाही ,सासरची मंडळी त्रास देतात ,मुले लहान आहेत.म्हणुन या व्यवसायात आले. यामुळे कारवाई करणारेही भावनिक होऊन कारवाई न करता सोडून देतात.

अशांच्यावर  कारवाई केल्यास समाजात,पाहुण्यात मानहानी होईल या भितीने या व्यवसाया  पासून दूर जातील अशा व्यवसाय करणारया महिला आपल्या नातलंगाना ,शेजारी पाजारयांना तु काय काम करतेस असे कोणीतरी विचारले की,मी हाऊस किपिंग काम करते ,किंवा एखाद्या मॉल काम करत असल्याचे काही महिला सांगतात.मग जाहिरात बाजी करणाऱ्यांकडे कामावर ठेऊन घेणारयांच्याकडे पगारासाठी एवढं कुठून येतं हा व्यवसायात आणि कोणी भागिदार आहे का या सर्वाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे अशी जोरदार जनतेतून मागणी होत आहे. कोल्हापुर शहरात नवीन आलेले अधिकारी या काळेधंदे वाल्याचा बिमोड करतील का ?.अशी नागरिकांतुन  विचारणा होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post