प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-फुलेवाडीतील एका युवकाला लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या निमीत्ताने संशयीत वधू -वर सूचकच्या मालकाने त्या युवकाच्या घरी चोरी करून साडे पाच लाख किमंतीचे दागिन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशीत उघडकीस आला.
पोलिसांनी सदर मालक रोहन रविंद्र चव्हाण (25 ,रा.फुलेवाडी). याला अटक करून त्याच्या कडून चोरीस गेलेला मुद्दे माल आणि दुचाकी हस्तगत केली आहे.हा प्रकार अयोध्या कॉलनीत विपुल चौगुले यांच्या घरी घडला होता.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली होती .स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी विशेष पथके तयार करून गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयीताचा फुलेवाडी ते रंकाळा टॉवर परिसरात वावर असल्याची माहिती मिळाली तेथे सापळा रचून चव्हाण याला ताब्यात घेऊन अंग झडतीत त्याच्याकडे विपुल चौगुले यांच्या घरातलं चोरलेले दागिने आढ़ळून आले.पोलिसांनी संशयीताकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे.चौगुले कुंटुंबीय गावी गेले होते ते परत आल्यावर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.